Ration Card : जर तुम्हीही मोफत रेशन घेत असाल तर तुमच्यासाठी आता एक खुशखबर आहे. कारण केंद्र सरकारने देशभरातील रेशन वितरणाचा नियम बदलला आहे. आता रेशन कार्डधारकांना दर महिन्याला खास प्रकारचा तांदूळ मोफत मिळणार आहे.
देशातील महिला आणि बालकांमधील कुपोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रेशन कार्डधारकांना आता फोर्टिफाइड तांदूळ देण्यात येणार आहे. त्यामुळे आता तुम्ही पुढच्या वेळी रेशन घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला हा नवीन नियम माहिती असावा.

मिळणार भरपूर पोषक तत्व
जो व्यक्ती फोर्टिफाइड तांदूळ खातो त्याला लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात मिळते. पौष्टिक घटकांनी समृद्ध असणारा हा तांदूळ साधारण तांदळासारखाच चवीला असतो. इतकेच नाही तर स्वयंपाक करण्याची पद्धतही पारंपारिक आहे. फरक फक्त इतकाच असतो की यात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. खरं तर, कुपोषणाने त्रस्त असणाऱ्या बालकांना चांगला आहार देण्यावर सरकारचे लक्ष आहे.
महिन्याला मिळेल मोफत गहू-तांदूळ
केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. याअंतर्गत पात्र कुटुंबाला प्रत्येक महिन्याला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू एका युनिटवर वाटप केले जात आहे. इतकेच नाही तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक शिधापत्रिकेवर 21 किलो तांदूळ आणि 14 किलो गहू मोफत देण्यात येत आहे.
आता रेशनकार्डधारकांना शासनाकडून गहू तांदूळ निश्चित प्रमाणात वाटप केले जात आहे. अनेक जिल्ह्यांत फोर्टिफाइड तांदळाचे वाटप झाले आहे. जेथे वाटप मिळालेले नाही, तेथे ते लवकरच पोहोचण्यास सुरुवात होईल.