Maharashtra News:आज पहाटे देशाच्या बहुतांश भागात भूकंप झाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून ते थेट जम्मूपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
यावेळी सर्वजण गाढ झोपेत होते. भूकंपाची विविध ठिकाणी नोंद झाली आहे. मात्र, यामुळे कोणतेही नुकसान झाल्याची बातमी आतापर्यंत आलेली नाही.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार २५ आणि २६ ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरपासून ते महाराष्ट्रापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.
अफगाणिस्तानमध्येही धक्के जाणवले. मात्र, कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही. सर्वांत आधी महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार महाराष्ट्रातील कोल्हापूरात रात्री २.२१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.९ इतकी नोंदवण्यात आली.
भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर खोल होता. महाराष्ट्रानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिम्मोलॉजीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये रात्री ३ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपाचे केंद्र कटरापासू ६२ किलोमीटर उत्तर पूर्वकडे ५ किलो मीटर अंतरावर होता. त्याची तीव्रता ३.४ इतकी नोंदवण्यात आली.