Flipkart Deal : चर्चा तर होईलच! फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करता येतोय 5G स्मार्टफोन

Published on -

Flipkart Deal : जगभरातील बाजारांसह भारतीय बाजारात 5G स्मार्टफोनचा दबदबा आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याकडेही जबरदस्त फीचर्स असणार स्मार्टफोन असावा असे वाटते. जर तुम्हालाही असाच एक स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते.

कारण तुम्ही आता मोटोचा Motorola G62 5G 21,999 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 699 रुपयात विकत घेऊ शकता. यावर एक्सचेंज ऑफरसह इतर ऑफर आहेत. पाहुयात या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये, तुम्हाला 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच फुल एचडी + डिस्प्ले मिळत असून तो 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. यामध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. तर प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या 5G फोनमध्ये कंपनीने एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत.

यामध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी कंपनीकडून या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिली असून ती बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटोच्या OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 वर काम करतो. 5G व्यतिरिक्त, या फोनमध्ये 4G, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.1 आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय कंपनीने दिले आहेत, जे 1 TB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करतात. हा फोन मिडनाईट ग्रे आणि फ्रॉस्टेड ब्लू कलर या 2 पर्यायांमध्ये येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News