Recharge Plan : चांगल्या इंटरनेट कनेक्शनसाठी, जर तुम्ही प्लॅन्स शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. कारण आता तुम्ही कमी किमतीत हाय स्पीड इंटरनेट असणारा प्लॅन घेऊ शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तुम्हाला एकूण 14 OTT ॲप्स मोफत मिळत आहेत. जिओ फायबर, एअरटेल आणि BSNL या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व प्लॅन्सच्या किमती आणि फायदे कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात.
जिओ फायबरचा 899 रुपयांचा प्लॅन
जिओ फायबरच्या या 899 रुपयांच्या तुम्हाला प्लॅनमध्ये 100Mbps इंटरनेट स्पीड असणारा अमर्यादित डेटा मिळेल. तसेच तुम्हाला मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 550 हून अधिक टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश मिळेल. त्याशिवाय Disney + Hotstar, Sony Live, G5, Voot Select आणि G5 सारख्या 14 OTT ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
799 रुपयांचा एअरटेलचा प्लॅन
एअरटेल आपल्या वापरकर्त्यांना 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगचे फायदे मिळतील. या प्लॅनच्या सदस्यांना Airtel Extreme Premium मध्ये प्रवेश मिळेल.तसेच तुम्हाला विंक म्युझिकची सदस्यता मिळेल.
799 रुपयांचा BSNL चा ब्रॉडबँड प्लॅन
BSNL च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा मिळेल परंतु, त्याआधी तुम्हाला प्लॅनमध्ये उपलब्ध असणारा1000 GB डेटा खर्च करावा लागणार आहे. या प्लॅनच्या सदस्यांना,हॉटस्टार सुपर, हंगामा, सोनी लिव्ह, जी5, वूट आणि लायन्स गेट या इतर काही OTT अॅप्स मोफत मिळतील.