Best Electric Scooter in India : देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांनी इलेक्ट्रिक स्कुटरला पसंती मिळत आहे. परंतु, मार्केट्मध्ये जास्त स्कुटर आल्यामुळे कोणती स्कुटर घ्यावी असा प्रश्न पडत आहे.
जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला देशातील ३ बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती देणार आहोत, याची केवळ फीचर्स पाहून तुम्ही ती खरेदी कराल.
1. Ola S1 आणि Ola S1 Pro
भारतात Ola च्या स्कुटरची सर्वात जास्त विक्री होते. कंपनीच्या Ola S1 आणि Ola S1 Pro या दोन इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी आहे. यांच्या फीचर्सबाबत सांगायचे झाले तर, Ola S1 प्रकारात 2.98KWh बॅटरी पॉवर पॅक आणि Ola S1 चा टॉप स्पीड 90 प्रति तास किलोमीटर आहे, तर किंमत 85,099 रुपये आहे.
Ola S1 Pro प्रकार 8.5KWh इलेक्ट्रिक मोटर आणि 3.97KWh बॅटरी पॉवर पॅक देण्यात आला आहे. Ola S1 Pro चा टॉप स्पीड 115 किलोमीटर प्रति तास आहे. तर Ola S1 Pro ची किंम 110,149 रुपये आहे.
2. TVS आणि Qube ST
TVS आणि Qube ST या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला 4.4 kW हब-माउंटेड BLDC मोटरसह 4.56 kWh लिथियम आयन फिक्स्ड बॅटरी मिळेल.रेंजबद्दल सांगायचे झाले, तर ते 145 किमी/से. TVS i Qube ST इलेक्ट्रिक स्कूटर ही TVS इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमधील सर्वोत्तम स्कूटर आहे. ही स्कुटर तुम्ही केवळ 999 रुपयांमध्ये बुक करू शकता.
3. Infinity Bounce E1
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला 48V/39Ah लिथियम-आयन बॅटरीसह BLDC मोटर मिळेल. त्याचबरोबर स्कुटरचा टॉप स्पीड 65 किमी/तास आहे. ही स्कूटर 8 सेकंदात 0 ते 40 किमी/तास वेगाने धावते. 1 सिंगल चार्जमध्ये सुमारे 85 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज दिली जात आहे.