Best Phone : बाजारात अनेक जबरदस्त फिचर असलेले स्मार्टफोन लाँच होत असतात. या स्मार्टफोनच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.
परंतु, आजही बाजारात कमी किमतीत येणारे दमदार स्मार्टफोन असतात. काही फास्ट चार्जिंगसह येणारे बेस्ट गेमिंग स्मार्टफोन आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनच्या किमती आणि फीचर्स जाणून घ्या
1. Realme GT Neo 3T
लिस्टमध्ये Realme GT neo 3T यांसारख्या जबरदस्त स्मार्टफोनच्या नावाचा समावेश आहे. या जबरदस्त स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसर त्याचबरोबर 80W सुपर डर्ट फास्ट चार्जिंगसोबतच यामध्ये 5000mAh बॅटरी आहे.
विशेष म्हणजे हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना तीन मागील कॅमेरे मिळतील. ज्यामध्ये 64MP+8MP+2MP च्या लेन्स आहेत. त्याचबरोबर 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या हॅंडसेटची किंमत 29,999 रुपये इतकी आहे.
2. Vivo V25 5G
लिस्टमधला दुसरा स्मार्टफोन Vivo V25 5G आहे. या स्मार्टफोनची किंमत 27,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 6.44-इंचाचा FHD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 900 प्रोसेसर मिळत आहे. 44W फास्ट चार्जिंगसह 4500mAh बॅटरी आहे. यामध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात 64MP+8MP+2MP लेन्स आहेत. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
3. Redmi K50i 5G
लिस्टमधला तिसरा स्मार्टफोन Redmi K50i 5G हा आहे. हा स्मार्टफोनमध्ये 67W टर्बो चार्जिंगसह 5080mAh बॅटरी मिळत आहे. जर तुम्ही एक जबरदस्त गेमिंग स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 6.6-इंचाचा Liquid FFS डिस्प्ले मिळत आहे. 64MP + 8MP + 2MP चे तीन रियर कॅमेरे आहेत. या 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 23,999 रुपये आहे.
4. iQOO निओ 6 5G
गेमिंग साठी हा स्मार्टफोन चांगला आहे. iQOO Neo 6 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.62 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. हा 80W चार्जिंगला सपोर्ट करेल त्याचबरोबर यामध्ये 4700mAh बॅटरी आणि Snapdragon 870 5G प्रोसेसर आहे. 64MP + 8MP + 2MP असे तीन रियर कॅमेरे आहेत. या फोनची किंमत 29,999 रुपये इतकी असणार आहे.
5. POCO F4 5G
लिस्टमधला हा POCO F4 5G पाच नंबरचा स्मार्टफोन आहे. कमी किमतीत हा स्मार्टफोन तुम्ही घरी नेऊ शकता. यामध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 4500mAh बॅटरी आणि Snapdragon 870 प्रोसेसर आहे. यात 6.67-इंचाचा FHD + E4 AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. फोनमध्ये 64MP मेगापिक्सेल AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिलेला आहे.