Beautiful Highways Of India : ‘हे’ आहेत देशातील सर्वात सुंदर हायवे, आता तुम्हीही घेऊ शकता लॉंग ड्राइव्हचा आनंद; पहा यादी

Beautiful Highways Of India : भारत देश हा नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणांना पर्यटक भेट देत असतात. केवळ देशातील नाही तर दुसऱ्या देशातील पर्यटकही या ठिकणांना भेटी देत आहेत. अनेकांना आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत लॉंग ड्राइव्हला जाणे पसंत करतात.

भारतात असे अनेक हायवे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही लॉंग ड्राइव्हसाठी जाऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व हायवे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हे हायवे कोणते आहेत पहा हायवेंची सविस्तर यादी.

बहुतेक जण याठिकाणी कुटुंब आणि जोडीदारासह लाँग ड्राईव्हचा आनंद घेण्यासाठी येत असतात. असेच काही सुंदर हायवे आहेत जिथे तुम्हीही जाऊ शकता. हे ठिकाण पाहण्यासारखे असून महामार्ग निसर्गाच्या कुशीत बांधले गेले आहेत.

हे आहेत भारतातील सर्वात सुंदर महामार्ग

1. अहमदाबाद ते वडोदरा महामार्ग

जर तुम्‍ही अहमदाबादला जाण्‍याचा विचारात असाल तर हायवे रोडमध्‍ये असणाऱ्या रस्त्याचे दृश्‍य पाहून तुम्‍हाला खूप आनंद होईल. या ठिकाणी तुम्ही आता तुमच्या जोडीदारासह किंवा कुटुंबासह लाँग ड्राईव्हवर जाऊ शकता. या महामार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ दिसत आहे.

2. वाराणसी ते कन्याकुमारी महामार्ग

वाराणसी ते कन्याकुमारी हा महामार्ग अतिशय सुंदर असून याठिकाणचे दृश्य आता खूप पाहण्यासारखे आहे. जर तुम्ही या मार्गावर प्रवास करण्याचा विचारात असाल तर तुम्ही हायवेवर लाँग ड्राईव्हचा आनंद घेऊ शकता.

3. मुंबई ते गोवा महामार्ग

मुंबई ते गोवा हा महामार्ग अतिशय वेगवान असून हा महामार्ग सुंदर नजारांमध्‍ये बांधण्यात आलेला आहे. याच्या आजूबाजूला असणारे मोठमोठे पर्वत आणि हिरवळ लोकांना भुरळ घालत आहे. आता जर तुम्ही ड्रायव्हिंग करून गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या मार्गाचा आनंद घेऊ शकता.

4. मनाली ते लेह हायवे

मनाली ते लेह दरम्यान बांधण्यात आलेला हायवे पाहण्यासारखा आहे. अनेकांना या ठिकाणी इथे लाँग ड्राईव्हवर जायला आवडते. मनाली आणि लेहला भेट द्यायला येणारा कोणीही या ठिकाणची दृश्ये पाहून कारने किंवा बाइकने प्रवास करणं पसंत करतो. कारण हे ठिकाण मंद वाऱ्याची झुळूक, रंगीबेरंगी पर्वत आणि अतिशय सुंदर दृश्यांमध्ये वसलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe