मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता ट्विट (Tweet) च्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
या ट्विट मध्ये मोजक्या शब्दात त्यांनी ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असे म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री व ठाकरे सरकारला डिवचले असल्याचे समजत आहे.
ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से !#Maharashtra #thursdayvibes
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 28, 2022
दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण अधिक तापत चालले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत.
योगी सरकारच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं अभिनंदन केले आहे. तर महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
कलियुग के इस राजा ने अब दिया एक फ़रमान है….
जो उगलेगा ‘च’ की गाली,
उसे इज़्ज़त और मान है,
जो जपेगा नाम प्रभु का,
उसकी हलक में जान है !#Maharashtra #Maharashtraunderattack— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 25, 2022
तसेच यापूर्वी अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. २५ एप्रिल रोजीही अमृता फडणवीस यांनी चार ओळींमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर टीका केली होती.
यामध्ये ‘कलियुग के इस राजा ने अब दिया एक फ़रमान है…जो उगलेगा ‘च’ की गाली, उसे इज़्ज़त और मान है, जो जपेगा नाम प्रभु का, उसकी हलक में जान है !’ असे ट्वीट त्यांनी केले होते.