Reliance Jio : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशातच सर्व टेलिकॉम कंपन्यांनीही आपले सर्व रिचार्ज महाग केले आहेत. परंतु, जिओचे असे काही रिचार्ज आहेत जे 250 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात.
यामध्ये ग्राहकांना कंपनी अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे देते. त्यामुळे ग्राहकांसाठी हे प्लॅन खूप फायदेशीर असतात, पाहुयात या प्लॅनची लिस्ट.
249 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनची वैधता 23 दिवस आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळत असून वापरकर्त्यांना Jio अॅप्सचा मोफत प्रवेश देत आहे.
239 रुपयांचा प्लॅन
239 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना रोज 1.5 GB डेटाचा लाभ घेता येतो. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधाही देत आहे. तसेच तुम्हाला Jio अॅप्सचा मोफत प्रवेश देखील मिळेल.
209 रुपयांचा प्लॅन
209 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा मिळतो. याची वैधता 28 दिवसांची असेल. त्याशिवाय तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील. तर Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.