Diabetes Control Spices : जगभरात मधुमेह असणाऱ्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात मधुमेही रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांना सतत रक्तातील साखर तपासून घ्यावी लागते. जर त्यांनी असे केले नाही तर ते अनेक आजारांना निमंत्रण देतात,
ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी स्वयंपाकघरातील काही मसाले खूप उपयोगी पडतात. हे मसाले कोणते आहेत? त्याचा काय फायदा आहे? ते जाणून घेऊयात.

पहा यादी
१. दालचिनी
एका कढईत दालचिनीची काडी टाकून ती चांगली उकळून दालचिनीचा चहा करा. तो गाळून सेवन करा. यात अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती चांगली असते. तसेच त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी दालचिनी खूप फायद्याची आहे.
२. मेथी दाणे
रात्रभर एका भांड्यात मेथीचे दाणे भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होत. यासोबतच तुमच्या हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते आणि खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होते.
३. आले
आल्याचे लहान तुकडे करा किंवा ठेचून ते उकळून त्याचा चहा बनवा. कारण आल्याचा चहा घेतला रक्तातील साखर नियंत्रणात राहते.












