Chanakya Niti : सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जाण्याची खूप इच्छा आहे. यासाठी अनेकजण पूरेपूर प्रयत्न करतात. मात्र प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही. यशस्वी रणनीति आणि संपूर्ण समर्पणाने प्रयत्न करणारेच त्यांच्या आयुष्यत यशस्वी होतात.
चाणक्य यांनीही अपयशाबाबत काही मते मांडली आहेत. अनेकांना आचार्य चाणक्य यांचे बोल कठोर वाटतात, मात्र ते प्रत्यक्षात व्यक्तीचे आयुष्य यशस्वी करण्यासाठी असतात. जर तुम्ही आचार्य यांच्या विचारांचे पालन केले तर तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीतसुद्धा सहज मार्ग काढू शकतो

अशा व्यक्तींना यश मिळत नाही
आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य धोरणात असे सांगितले आहे की जीवनात दोन प्रकारचे लोक असतात जे कठोर परिश्रम करूनही कधीच यशस्वी होत नाहीत. त्यांच्यात असणाऱ्या काही कमतरतांमुळे त्यांना पुन्हा पुन्हा अपयशाला सामोरे जावे लागते.
- अनेकजण विचार करतात पण कृतीकडे लक्ष देत नाहीत
याबाबत आचार्य चाणक्य असे सांगतात की, काही जण यश मिळवण्यासाठी खूप विचार करतात. परंतु, ते यश मिळण्यासाठी हे लोक त्यासाठी काहीच करत नाहीत. त्यामुळे लोक कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. यशस्वी होण्यासाठी माणसाने विचार करण्यासोबतच त्याच्या विचारावर कृती करावी. यशस्वी होण्यासाठी तुम्ही जी रणनीती बनवता त्यावर काम करा. केवळ विचार करून काहीही हाती लागत नाही. म्हणूनच सध्या त्या विचारांना एक फॉर्म देणे खूप महत्वाचे आहे.
- विचार न करता काम करणे
आचार्य चाणक्य यांच्या मते, विचार न करता काम करणाऱ्या व्यक्तींना कधीही यश मिळत नाही. कारण यश मिळवण्यासाठी योग्य ती रणनीती आखून त्या आधारे काम केले जाते. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करून ते ध्येय गाठण्यासाठी योजना करा.तुमचे ध्येय साध्य करण्याच्या मार्गात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी नियोजन तुम्हाला मदत करेल. जर आपण विचार न करता वागलो तर जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा त्यावर उपाय शोधण्यात तुमचा खूप वेळ वाया जातो. चाणक्य नीतीनुसार, दिशाहीन काम करणाऱ्यांना आयुष्यात कधीही यश मिळत नाही.