‘या दोन साखर कारखान्यांनी सर्वरोग निदान हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोविड १९ साथीच्या आजारात कोपरगाव तालुक्यातील काळे- कोल्हे साखर कारखान्यांनी कोविड सेंटर उभे करून जनतेला दिलासा दिला मात्र आता

या दोन्ही साखर कारखान्यांनी साईबाबा तपोभूमी परिसरात तालुक्यातील जनते करिता सुसज्ज सर्व रोग निदान व उपचार हॉस्पिटलची उभारणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल नाही त्यामुळे नागरिकांना लोणी येथील प्रवरा नगर,शिर्डी येथील साई बाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्यासाठी जावे लागते तर अनेक मोठ्या आजारासाठी नाशिक,

नगर किंवा पुणे येथे उपचार घेण्यासाठी धावपळ करावी लागते मात्र त्यात कोपरगाव येथील अनेक रुग्णांची वेळेवर उपचार मिळत नसल्याने हेळसांड व आर्थिक ओढाताण होते तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो.

कोपरगाव तालुक्यात कर्मवीर शंकरराव काळे व संजीवनी सहकारी साखर कारखाने आहेत कोविड १९ च्या साथीच्या आजारात या दोन्ही साखर काखान्यांनी आ आशुतोष काळे व युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या अथक परिश्रमातून कोविड सेंटरची उभारणी करून

तालुक्यातील जनतेला दिलासा दिलात्यामुळे तालुक्यातील रुग्णांना कोपरगाव शहरात उपचार करणे शक्य झाले मात्र या निमित्ताने कोपरगाव तालुक्याला सुसज्ज व सर्व सोयीनियुक्त हॉस्पिटलची आवश्यकता असल्याची जाणीव झाली असून

श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटलच्या धर्तीवर या दोन्ही साखर कारखान्यांनी एकत्र येऊन कोपरगाव शहरातील साई तपोभूमी या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी ट्रस्टच्या जागेवर सुसज्ज व सर्व सुविधानी युक्त हॉस्पिटलची उभारणी करावी

त्या साठी कोपरगाव शहरातील तज्ञ डॉक्टर व विविध शहरातील डॉक्टर यांना पाचारण करावे कोपरगाव तालुक्यातील काळे कोल्हे यांचे सरकार दरबारी चांगले वजन आहे.त्याचा वापर करून व साथीच्या आजारात तालुक्यातील नागरिकांना वेळेवर चांगली व दर्जेदार हॉस्पिटलची गरज असल्याचे

सरकारच्या निदर्शनात आणून देऊन अशा सुसज्ज हॉस्पिटल उभारणी करिता पुढाकार घ्यावा कोपरगाव तालुक्या नैसर्गिक आपत्ती,महापूर दुष्काळ परिस्थिती उद्भवल्यावरया दोन्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच सर्वोतोपरी मदत केली जाते.

या दोन्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून आता पर्यंत तालुक्यातील जनतेला खूप मोठ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे.मात्र या साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले असून या पुढे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून

देण्यासाठी या दोन्ही कारखान्यांनी एकत्र येऊन सुसज्ज हॉस्पिटल ची उभारणी करावी या साठी लवकरच लोक स्वराज्य आंदोलनाचे एक शिष्टमंडळ आ. आशुतोष काळे, माजी आ.अशोकराव काळे व जेष्ठ नेते बिपीन दादा कोल्हे व माजी आ.स्नेहलताताई कोल्हे तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांची भेट घेणार असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe