‘त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये’, “२०१९ ची निवडणुक शिवसेनेने मोदींचा फोटो लावून जिंकली”; फडणवीसांची शिवसेनेवर घणाघाती टीका

Published on -

पुणे : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) सडकून टीका केली आहे. तसेच त्यांनी २०१९ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेनेने कशी जिंकली हे सांगत शिवसेनेवर आरोप देखील केला आहे.

एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला एमआयएम पक्षला आघाडीत घेण्याची ऑफर दिली आहे. त्यावरून हिंदुत्वाचे राजकारण तापले आहे.

याच मुद्यांवरून भाजप शिवसेनेला पुन्हा पुन्हा डिवचत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेची लाचारी 2019 ला दिसली, मोदींचा फोटो लावून निवडणुका जिंकली असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) गेलेत, त्यांनी आम्हाला लाचारी शिकवू नये. असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. येत्या काळात शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

त्यांनी एमआयएमसोबत जावं किंवा नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांचे लोकं आज जनाब बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत, अजान स्पर्धा घेत आहेत.

राष्ट्रीय प्रश्नावर ते मोदींना विरोध करत आहेत, मात्र 370 कलम हटवलं तेव्हा संपूर्ण देश एक होता, तेव्हा हे विरोध करत होते.

त्यांना इतिहास माहिती नाहीये, 370 कलम हटवणारी भाजप आहे, राम मंदिर बांधणारी भाजप आहे, लाल चौकात तिरंगा लावायला शिवसेना नव्हती गेली भाजप गेली होती असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News