अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल अचानक कोल्हार मार्केटमध्ये पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन व्यावसायिकांची दुकाने अनिश्चित काळासाठी सील केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले, कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षिरसागर व जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे हे शिर्डी येथे जात असताना त्यांनी काल (मंगळवार) कोल्हारच्या बाजारपेठेत अचानक पाहणी केली.
येथील काही व्यावसायिक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याचे त्यांना आढळले. अशी तीन दुकाने सील केली आहेत.
कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रासही अधिकाऱ्यांनी भेट दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्यधिकारी डॉ. संजय घोलप यांना काही सूचना केल्या. यावेळी ग्रामसेवक शशिकांत चौरे व कर्मचारी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम