नागापूरमधील वाईन्स शॉप फोडून चोरटयांनी कॅशसह मद्याच्या बाटल्या लांबवल्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- एमआयडीसीतील नागापूर येथील राहूल वाईन्स वर चोरटयांनी डल्ला मारला आहे. यावेळी ६ लाख रूपये कँश चोरट्यांनी लंपास केली आहे तर मद्याचे अनेक बॉक्स चोरून नेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसी पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करण्यात येत आहे.

सन फार्मा कंपनी चौकात समोरच असलेल्या भर रस्त्यावरील दारूचे दुकान फुटल्याने उदयोजकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. त्यामुळे या चोरीचा तातडीने तपास लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या होऊनही त्याचा तपास लागत नसल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

दरम्यान गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येऊन नागरिकांना भयमुक्त नगर हवे असल्याची जनभावना निर्माण होऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe