अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदे शहरातील दौंड जामखेड या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा काही अज्ञात चोरट्यानी गुरुवारी मध्यरात्री प्रयत्न केला.
मात्र हा प्रयत्न असफल झाल्याने आत फसलेल्या चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करत एटीएमचे शटर एका बाजूने कट करत बाहेर निघून चोरटे पसार झाले.
घटनेची माहिती श्रीगोंदे पोलीसांना समजताच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. शहरातून जाणाऱ्या जामखेड रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्यासाठी अज्ञात चोरटे केबिनच्या आत जाऊन
कुणाला काही समजू नये म्हणून एटीएमचे शटर आतून लाऊन घेत मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना एटीएम मशिन फोडता न आल्याने त्यांचा प्रयत्न फेल गेला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम