Top electric cars : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे जास्तीत जास्त लोकांना कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. अशा स्थितीत भारतीय ऑटो बाजारात रोज नवीन वाहने लॉन्च होत आहेत.
भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक दमदार कार आहेत, अशातच जर तुम्ही सध्या स्वतःसाठी एक नवीन ईव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला ईव्ही मार्केटमधील सर्वोत्तम गाड्यांची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी उत्तम कार निवडण्यात मदत होईल.
भारतीय बाजारपेठेतील उत्तम इलेक्ट्रिक वाहने :-
MG Comet
भारतीय बाजारपेठेत ईव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट खरेदी करायची असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त तीन ते चार महिने वाट पाहावी लागेल. फक्त काही शहरांमध्येच या कारसाठी फक्त एक ते दोनच वेटिंग सुरू आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.98 लाख रुपये आहे.
Tata Tiago
टाटा ही भारतीय बाजारपेठेतील इलेक्ट्रिक कारच्या सर्वात मोठ्या विक्रेत्यांपैकी एक आहे. ही देशातील दुसरी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. देशातील अनेक शहरांमध्ये या कारसाठी एक ते दोन महिन्यांची प्रतीक्षा आहे, परंतु त्याची जास्तीत जास्त प्रतीक्षा तीन महिन्यांपर्यंत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे.
Tata Tigor
टाटाची ही दुसरी इलेक्ट्रिक सेडान कार आहे. जर तुम्हाला ईव्ही खरेदी करायची असेल तर तुम्हाला तीन महिने वाट पाहावी लागेल. या कारची किंमत 12.49 लाख रुपये आहे.
Tata Nexon
एक कॉम्पॅक्ट SUV, Nexon देखील इलेक्ट्रिक आवृत्तीमध्ये ऑफर केली जाते. या कारची किंमत मॅक्स व्हेरियंटमध्येही उपलब्ध आहे. या दोन्ही प्रकारांसाठी, कमाल चार महिने आणि किमान 20 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. या SUV ची किंमत 14.49 लाख रुपये आहे.