Best 7 Seater Car : दिग्ग्ज कंपन्यांना टक्कर देतेय ही 7 सीटर कार, फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Ahmednagarlive24 office
Published:

Best 7 Seater Car : अनेकांना कुटुंब मोठे असल्यामुळे कुठेही एकत्र जाणे अवघड होते. त्यामुळे अनेकांना आपल्याकडे एक मोठी 7 सीटर कार असावी असे वाटते, ज्यात संपूर्ण कुटुंबासह प्रवास करू शकता. परंतु, कमी बजेटमुळे हे शक्य होत नसेल तर काळजी करू नका.

कारण तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.कारण तुम्ही आता Kia Carens ही कार कमीत कमी पैशात खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कार मार्केटमधील इतर कार्सना टक्कर देत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना कमी किमतीत जबरदस्त फीचर्स देत आहे.

दरम्यान Kia Carens साठी जानेवारी हा सर्वोत्तम महिना ठरला आहे कारण मागच्या महिन्यात या कारच्या एकूण 7,900 युनिट्सची विक्री झालेली होती. या अगोदर, या कारची सर्वात जास्त विक्री जून महिन्यात झाली होती. त्याचे 7,895 युनिट्स विकले गेले. एका अहवालानुसार, लॉन्च झाल्यानंतर एका वर्षात या कारचे तब्बल 70,656 युनिट्स विकले गेले आहेत.

किया इंडियाने 2022 मध्ये 254,556 युनिट्सच्या विक्रीसह वर्षातील सर्वात मोठी विक्री नोंदवली आहे. जी 2021 पेक्षा 40% खूप जास्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Kia India च्या एकूण विक्रीत Kia Carens चाही खूप मोठा हात आहे. मागच्या महिन्यात, कंपनीने भारतात प्रवेशाची 4 वर्षे पूर्ण केली असून या कालावधीत त्यांनी एकूण 6.5 लाख कारच्या विक्रीचा आकडा पार केला आहे.

झाली आहे प्रचंड विक्री

भारतीय मार्केटमध्ये Kia Carens च्या कार्स खूप विकल्या गेल्या आहेत. पहिल्या 24 तासातच 7,738 बुकिंग झाले तसेच यानंतर, 10 मार्चपर्यंत बुकिंगचा आकडा 50,000 च्या पुढे गेला होता. सध्या या कारची किंमत 10.20 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18.45 लाख रुपयांपर्यंत आहे. यात 1.5 लिटर पेट्रोल, 1.4 लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe