Oben Rorr Electric Bike : सिंगल चार्जमध्येच 200 KM गाठते ‘ही’ बाईक; 999 रुपयांमध्ये करता येणार बुक

Ahmednagarlive24 office
Published:

Oben Rorr Electric Bike  : लवकरच भारतीय बाजारपेठेत Oben Rorr आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे ही बाईक एकदा चार्ज केल्यावर 200 किमी पर्यंतची रेंज देत आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

बॅटरी 2 तासात पूर्ण चार्ज होते. जर ग्राहकांना ही बाईक बुक करायची असेल तर ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकतात.

ही बाईक पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2023 मध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने या बाईकचे अनावरण केले होते. तेव्हापासून ती बाइक चर्चेचा विषय बनली आहे. जानेवारी 2023 पासून बाइकची डिलिव्हरी सुरू होणार आहे. सध्या 17000 हजारांपेक्षा जास्त बुकिंग झाले असल्याचे कंपनीचे मत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

सिंगल चार्जमध्ये चार्जवर ही बाईक 200 किमी अंतर कापते.समजा तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि गुरुग्राममध्ये नोकरी करत असाल, तर तुम्ही एकदा चार्जिंगमध्ये सहज जाऊ शकाल.

टप्प्या टप्य्यात ही बाईक उपलब्ध होणार असून सुरुवातीला कंपनी 9 शहरांतील लोकांना ती उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, जयपूर आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे.

म्हणूनच तरुणाईला भुरळ घातली आहे

4.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक
13.4 bhp ची पॉवर आणि 62Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल
सिंगल चार्जवर 200 किमीची रेंज देईल
0 ते 40 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी फक्त 3 सेकंद लागतील
कमाल वेग 100 किमी प्रतितास इतका आहे.

या रंगांमध्ये उपलब्ध होईल

यात नेव्हिगेशन, टेलिफोनी, वाहन निदान, कनेक्टेड तंत्रज्ञान, ड्रायव्हर अलर्ट सिस्टम दिली आहे. माहितीनुसार, हे हॅवोक मोडमध्ये 100 किमी, सिटी मोडमध्ये 120 किमी आणि इको मोडमध्ये 150 किमीची रेंज देईल. या बाइकची स्पर्धा Revolt RV400, Ola S1 इत्यादी बाईकशी होईल.

तुम्हाला ही बाइक टेस्ट राइडसाठी 999 रुपये भरून प्री-बुकिंग करता येत आहे. ही बाइक लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. तिची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 1,02,999 रुपये आहे तर महाराष्ट्रात एक्स-शोरूम किंमत 1,25,000 रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe