Broadband Plan : एअरटेल, जिओला आणि व्होडाफोन आयडियाचे अनेक प्लॅन सध्या खूप प्रसिद्ध आहे. या कंपन्या आपल्या ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन नवनवीन प्लॅन सादर करत असतात.
अशातच आता या सर्व कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक कंपनी पुढे आली आहे. नेटप्लसने आपला सर्वात स्वस्त आणि अनेक फायदे देणारा ब्रॉडबँड प्लॅन लाँच केला आहे.

दिग्ग्ज कंपन्यांना देणार टक्कर
हा नेटप्लसचा ब्रॉडबँड प्लॅन आहे. निवडक शहरांमध्ये कंपनीची ही सेवा उपलब्ध आहे. या कंपनीने एक स्वस्तात मस्त ब्रॉडबँड प्लॅन आणला आहे. त्याशिवाय नेटप्लसकडून ब्रॉडबँड ऑफरही देण्यात येत आहे.
असा मिळतो इंटरनेट स्पीड
इंटरनेट स्पीडबद्दल बोलायचे झाले तर नेटप्लस ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 1GBPS पर्यंत स्पीड वापरकर्त्यांना मिळू शकतो. तसेच या प्लॅनसोबत अनलिमिटेड डेटाही दिला जात असून दोन महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सुविधा दिली जात आहे.
असे मिळवा मोफत इंटरनेट
जर तुम्हालाही एकूण दोन महिन्यांसाठी मोफत इंटरनेट मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला दीर्घ मुदतीचा वैधता प्लॅन घ्यावा लागणार आहे.समजा जर तुम्ही 5 महिन्यांसाठी ब्रॉडबँड प्लॅन घेतला तर 1 महिन्यासाठी मोफत इंटरनेट सुविधा मिळेल, तर 10 महिन्यांसाठी ब्रॉडबँड प्लॅन घेतला तर तुम्हाला 2 महिन्यांसाठी फुकट इंटरनेट वापरता येईल.
जाणून घ्या प्लॅनची किंमत
हे लक्षात ह्या की नेटप्लस ब्रॉडबँड प्लॅन OTT फायद्यांशिवाय आणि OTT फायद्यांसह आहेत. त्यामुळे त्याची किंमत कमी जास्त होते. कंपनीच्या मूळ ब्रॉडबँड प्लॅनची किंमत 499 रुपये इतकी आहे. यात वापरकर्त्यांना अमर्यादित डेटा आणि कॉलिंग फायदे मिळतात. हा प्लॅन 100Mbps स्पीडसह येतो.
येथे मिळत आहे सुविधा
या ब्रॉडबँड प्लॅनची सेवा फक्त उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड किंवा राजस्थानमध्ये उपलब्ध आहे.