एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय ठाकरेंना मान्य, मोठा वाद मिटणार

Published on -

Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केला आहे. त्यामुळे यावरून निर्माण झालेला मोठा वाद मिटणार आहे.

अर्थात तो राजकीय नसून विमानतळाच्या नावाचा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी विमानतळाच्या या नावाला सहमती दर्शवली आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या विमातळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला गेला होता. तर प्रकल्पग्रस्तांकडून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत.

याच आंदोलकांची बैठक आज मातोश्रीवर झाली.त्यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मी दिलेले नाही. दि. बा. पाटील यांच्या नावाला माझा विरोध नाही. एकनाथ शिंदे यांनी हे जे नाव दिले आहे, त्याला माझा विरोध नाही.

भूमीपुत्रांनी केलेल्या विनंतीनुसार सर्व समाजाच्या लोकांना बोलावून तुमच्या भावनेचा विचार करून नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव द्यायाचे जाहीर करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यामुळे यावरून उफाळलेला मोठा वाद टळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe