Maharashtra News:गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या बारा आमदारांच्या यादीसंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित असलेली ही याची सरकारने मागे घेतली आहे. आता सुधारित यादी दिली जाणार आहे.

त्यामुळे या बारा जागांवर शिंदे गट व भाजप समर्थकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती.
मात्र राजकीय डावपेचांमुळे ती तेव्हापासून प्रलंबित राहिली. राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत.
आता ही यादी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे केली आहे. या जागांवर शिंदे सरकार आता नवीन नावे सुचवणार आहे.