अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील केलवड येथील जनावरांचा मृत्यू घटसर्प आजारातून झाला आहे, असे निरीक्षण पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. जनावरांचे शवविच्छेदन केल्यानंतर जनावरांना घटसर्प हा आजार झाल्याचे लक्षात येत आहे. २५० निरोगी जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.
जनावरांसाठी सोडा व चुना वापरावा जेणेकरून इतरांना हवेतून आजाराचा संसर्ग होणार नाही. गावात हा आजार कसा आला, याविषयी चौकशी केले जाईल. परंतु सध्या जनावरे वाचवण्यावर आमचे लक्ष राहील. अशी माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
केलवड गावात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजारी व निरोगी जनावरांवर जलदगतीने कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेकडून मृत जनावरे पशुपालकांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन अधिकारी यांनी केलवड गावात दररोज पशुवैद्यकीय अधिकारी नेमले असून ते गावातील जनावरांची तपासणी करून लसीकरण करीत आहेत. तसेच प्रशासनाकडून बाधित जनावरांसाठी औषधे पुरविण्यात येत आहेत.
घटनास्थळी भेट देण्यास जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण हरिषचंद्रे, नाशिक विभागीय अधिकारी डॉ. ए. जे. ठाकरे, कृषी विज्ञान शास्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, पंचायत समिती पशू अधिकारी किशोर शेळके,
पशुसंवर्धन अधिकारी शैलेश बन, पशुवैद्यकीय अधिकारी रामभाऊ पवार, डॉ. विठ्ठल विखे, बाळासाहेब गमे, संदीप गमे, अंजाबाप्पू जटाड, डॉ. विकास गमे, डॉ. विजय चौधरी, डॉ. शरद गमे उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम