जिल्हा परिषदेची पशुपालकांसाठी ‘ही’ अनोखी योजना

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यातील पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठी आता जिल्हा परिषदेकडून किसान कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.(Ahmednagar ZP)

यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान प्रत्येक शुक्रवारी तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती सुनील गडाख यांनी केले आहे. केंद्र शासनाने पीक कर्ज सवलती प्रमाणेच पशुपालकांसाठी किसान कार्ड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

या योजने अंतर्गत पशुपालकांना एक लाख ६० हजार रूपयांपर्यंत जनावरांचा चारा, औषधे, लसमात्रा, पशुखाद्यांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे.

ही सुविधा दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन, मत्सव्यावसाय, शेळी पालन, मेंढीपालन व वराह पालन या व्यवसायांसाठी उपयोगी ठरणार आहे.

या योजने अंतर्गत अवघ्या सात टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार असून शासनामार्फत दोन टक्के व्याज सवलत दिली जाणार आहे.

पशुपालकाने नियमित कर्जफेड केल्यास ज्यादाची तीन टक्के सवलत मिळणार आहे. सदर योजनेबाबत अधिक माहीती व मार्गदर्शन नजिकच्या पशुवैद्यकीय

दवाखाना किंवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!