अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना जाहीर आव्हान देखील दिलं. भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!;
पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.” अरविंद सावंत यांनी भाजपाची मदत न घेता मुंबईत खासदार होऊन दाखवावं, असं जाहीर आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं.

याचबरोबर, यापुढे भाजपा आपल्यासोबत प्रामाणिकपणे राहिलेल्यांच्या आधारे व संघटन वाढवून सरकार आणेल. असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं. सध्या भाजपा प्रदेशाध्यक्ष हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,
“यापुढे भाजपा आपल्या बरोबर प्रामाणिकपणे राहिलेल्या, आरपीआय, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांच रयत क्रांती संघटना, विनायकराव मेटे यांची शिवसंग्राम, विनय कोरे यांची जनसुराज्य या पक्षांच्या आधारे आणि संघटन वाढवून आम्ही आमच्या जीवावर सरकार आणू. मध्यप्रदेश,
राजस्थान, गुजरातमध्ये आम्हाला कोणता पक्ष लागत नाही. त्यामुळे यापुढे विश्वासघात पुरे. काय होतं यांचं विदर्भात, काय अस्तित्व होतं शिवसेनेचं मराठवाड्यात? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांनी हाताला धरून आणलं. जागांचं वाटप केलं, जागा विजयी केल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम