‘ही’ मारुती कार देते 31 किमीचे मायलेज; 54 हजारांत घरी आना नवी कोरी कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-फायनान्सवर कार खरेदी करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. जर आपण मारुती एसप्रेसो कार फायनान्सवर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 54 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर आपण या कारचे एलएक्सआय सीएनजी मॉडेल घरी घेऊन येऊ शकता. ही कार 31 किमी प्रति किलोग्राम सीएनजीचे मायलेज देते.

या कारची एकूण किंमत 5,36,376 रुपये आहे. 54 हजार रुपयांच्या डाउनपेमेंटवर आपण ही कार घेत असाल तर तुम्हाला एकूण 4,82,376 रुपये कर्ज घ्यावे लागेल. या कर्जाच्या रकमेवर 9.8% व्याज दर लागू होईल. या पाच वर्षांत तुम्हाला 1,29,744 व्याज देऊन एकूण 6,12,120 रुपये द्यावे लागतील. यावेळी तुम्हाला 10,202 रुपये ईएमआय द्यावा लागेल.

तुम्हाला ईएमआयचा बोजा कमी हवा असेल तर तुम्ही सात वर्षांसाठीदेखील कर्ज घेऊ शकता. या काळात तुम्हाला एकूण 4,82,376 रुपयेच कर्ज घ्यावे लागेल. पाच वर्षांत तुम्हाला 1,86,096 रुपये व्याज सह एकूण 6,68,472 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला पाच वर्षांसाठी दरमहा 7,958 रुपये ईएमआय भरावा लागेल.

या कारमध्ये फ्रंट आणि रियर बाम्पर्सचे विशेष आकर्षण आहे. मारुती सुझुकीची या छोट्या कारची 27 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. रियर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम सारख्या सुविधा सर्व वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. समोरचा लूक एकदम बोल्ड आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe