छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ‘त्या’ अभिनेत्याने केलेले ‘हे’ आक्षेपार्ह विधान खपवून घेतले जाणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ‘असा’ निर्णय…

Sushant Kulkarni
Published:

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल उलटसुलट सांगोवांगीच्या गोष्टी कमाल आर. खान याने ‘एक्स’वरील वादग्रस्त पोस्टमधून लिहिल्यामुळे महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पोस्टबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.केआरकेने विकीपीडियावरून ही वादग्रस्त माहिती घेतल्याचे समोर आल्यावर विकीपीडियाला ही माहिती काढून टाकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल जात असतानाच केआरकेने ही पोस्ट टाकली होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर महासंचालकांकरवी विकीपीडियाला संबंधित विवादास्पद मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत.फडणवीस म्हणाले, मी सायबरच्या आयजींना विकीपीडिया वरील आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माहिती दिली आहे.

त्यांना विकीपीडियाशी संपर्क साधून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.विकीपीडिया भारतातून चालवले जात नाही.त्यांचे स्वतःचे काही नियम आहेत. त्यामुळे ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करण्याऐवजी त्या संदर्भात काही नियम तयार करा,असा सल्ला त्यांना देऊ शकतो,असे फडणवीस यांनी सांगितले. विकीपीडियाने छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा वादग्रस्त मजकूर हटवला नाही तर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला निषेध

छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो.राज्य सरकारने सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क केला आहे.त्यांनी विकीपीडियाशी बोलून संभाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती हटवून योग्य माहिती प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व खोट्या गोष्टी हटवून योग्य माहिती देण्यात यावी, असे आदेशही दिल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

प्रकरण का तापले

केआरकेने सोमवार,१७ फेब्रुवारीला केलेल्या ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये विकीपीडियावरील माहितीचा आधार घेतला होता.ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या व आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. ‘छावा’च्या प्रदर्शनानंतर केआरकेने केलेली ही वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती हटवण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe