Maharashtra News:मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
ऋतुजा लटके यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असा आददेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. लटके यांना शिवसेनेने मुंबईतील विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली आहे.
त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची मुदत आहे. मात्र, लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली. राजकीय दबावामुळे आपला राजीनामा अडविला असून निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावर मुंबई उत्तर दिले की, ऋतुजा लटके यांच्याविरोधात एक तक्रार प्रलंबित आहे. त्यांनी लाच मागितल्याची तक्रार १२ ऑक्टोबरला आली आहे. त्याचा चौकशी बाकी असल्याने राजीनामा स्वीकारला नाही.
महापालिकेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, माझा राजीनामा विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट दिवसांत स्वीकारावा, असे म्हणण्याचा कर्मचाऱ्याला अधिकार नाही. तो कधी स्वीकारायचा हा अधिकार नोकरी देणाऱ्याचा असतो.
अशा प्रकरणांत कोर्टालाही आदेश देण्याचा अधिकार नसतो. जोपर्यंत राजीनामा स्वीकारला जात नाही तोपर्यंत कर्मचारी पालिकेच्या सेवेतच असतो. एक महिना नोटीसच्या कालावधीतही आयुक्तांना निर्णय घेण्याचा अधिकार असतो. शेवटी न्यायालयाने लटके यांनी दिलासा देणारा निर्णय दिला.