अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- सामान्य नागरिकांनी कोणतेही फलक लावले किंवा आपले उपजीविका चालवण्यासाठी गाडी लावली असता अतिक्रमण केल्यास मनपा अतिक्रमण विभाग कायदेशीर व दंडात्मक कारवाई करते.
परंतु नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दौरा निमित्त काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मंत्र्यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर फलक व कमानी लावण्यात आल्या शासनाच्या कोणत्याही कार्यालयासमोर व आवारात राजकीय फ्लेक्स बोर्ड लावण्यास प्रतिबंध असते.
त्या अनुषंगाने कारवाई होण्यासाठी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली परंतु सामान्य गोरगरीब जनतेकडून काही चुकल्यास त्वरित गुन्हे दाखल मनपा करते व यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाने तक्रार करूनही कोणतीच कारवाई न केलेली दिसत आहे.
लेखी पत्र देत नाही हे पाहता 5 मार्च पत्राची व कारवाईचे लेखी उत्तर न दिल्याने शिवराष्ट्र पक्षाच्या वतीने संबंधित फलक लावणारया विरुद्ध मनपा का कारवाई करत नाही या विरुद्ध मनपा विरुद्ध स्वतः शिवराष्ट्र सेना कायदेशीर गुन्हा दाखल करणार अशी माहिती पक्ष अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिली यावेळी बोलताना सांगितले
की येणाऱ्या काळात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कायदेशीर मार्गाचे पालन केले पाहिजे व सामान्य जनतेवर अन्याय न करता न्याय दिला पाहिजे अशी मागणी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम