Novartis Lay-Off: या फार्मा कंपनीने एकाच झटक्यात 8000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण जाणून घ्या?

Novartis Lay-Off: स्विस फार्मा कंपनी नोव्हार्टिस (Novartisk) मोठ्या प्रमाणावर ले-ऑफ करून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. एका अहवालानुसार, कॉस्ट कटिंगचा हवाला देत कंपनीने जगातील विविध देशांमध्ये असलेल्या आपल्या शाखांमधून सुमारे 8000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

नोव्हार्टिस कंपनीने या टाळेबंदीबाबत म्हटले आहे की, त्यांच्या जगभरातील शाखांमधून 7 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना होती, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनीच्या वतीने निवेदन जारी करून, ले-ऑफ (Lay-off) च्या या निर्णयाला पुनर्रचना कार्यक्रम असे संबोधण्यात आले आहे.

अहवालात नमूद केले आहे की नोव्हार्टिस कंपनीच्या विविध देशांमध्ये असलेल्या शाखांमध्ये सुमारे 1,08,000 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने एप्रिल महिन्यात अशा प्रकारची टाळेबंदी (Lockout) करण्याचे संकेत दिल्याचे त्यात म्हटले आहे.

मंगळवारी कंपनीच्या अनेक शाखांमधून हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची पुष्टी झाली. मात्र, नेमके किती कर्मचारी कामावरून कमी झाले, याची माहिती देण्यात आलेली नाही.

नोव्हार्टिसच्या स्वित्झर्लंड (Switzerland) मधील शाखेत काम करणाऱ्या 11,600 कर्मचाऱ्यांपैकी 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तर जागतिक स्तरावर सुमारे 8,000 कर्मचारी या टाळेबंदीच्या कक्षेत आले आहेत.

कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, कंपनीचे प्रमुख वास नरसिंहन (Vaas Narasimhan) यांनी सांगितले की, ही टाळेबंदी पुनर्रचना पुशचा एक भाग आहे.

कंपनीला नवे रूप देण्यासाठी असे कठोर पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे नरसिंहन यांनी म्हटले आहे. नोव्हार्टिसने आखलेल्या योजनेनुसार, पुनर्रचना (Reconstruction) कार्यक्रमांतर्गत, कंपनीने 2024 पर्यंत 1 अब्ज डॉलर्सची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नरसिंहन यांनी माहिती देताना सांगितले की, ज्याठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल, तेथे छाटणी केली जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe