पक्ष आणि चिन्हाचा उद्धव ठाकरे गटाकडून हा प्रस्ताव सादर

Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार उद्धव ठाकरेंच्या गटाकडून ३ चिन्ह आणि पक्षाच्या नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर आज देण्यात आले.

त्यानुसार त्रिशूळ , उगवता सूर्य व मशाल ही चिन्हे मागितली आहेत. तर पक्षाला नाव शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे ) किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे सुचविले आहे.

शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे नावावर दावा केला जाऊ शकत असल्याने ठाकरे यांनी आपल्या तीन पिढ्यांची नावे सुचविली आहेत. यावर आजच निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे