PM Svanidhi Yojana: रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ही योजना, सरकार गॅरंटी शिवाय देतंय कर्ज…..

PM Svanidhi Yojana: देशातील लहान व्यवसाय (Small business) करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) एक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत नवीन रोजगार सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते.

सरकारने ही योजना विशेषतः रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू केली होती, ज्यांच्या रोजगारावर कोरोना महामारीच्या काळात वाईट परिणाम झाला होता. या योजनेचे नाव पीएम स्वानिधी योजना (PM Swanidhi Yojana) आहे. सरकारने ही योजना 2024 पर्यंत वाढवली आहे.

व्याज अनुदान (Interest subsidy) –

पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे कर्जाच्या व्याजावर सबसिडी दिली जाते. जर एखाद्याने पहिल्यांदा घेतलेल्या कर्जाची परतफेड केली तर तो दुसऱ्यांदा 20 हजार रुपये आणि तिसऱ्यांदा 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी पात्र आहे.

आधार कार्ड आवश्यक –

पीएम स्वानिधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड (AADHAAR CARD) असणे आवश्यक आहे. या कर्जासाठी कोणतीही हमी देण्याची गरज नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम 3 महिन्यांत हस्तांतरित केली जाते. एका वर्षाच्या कालावधीत दरमहा हप्त्यांमध्ये त्याची परतफेड केली जाऊ शकते.

कर्जासाठी अर्ज कसा करावा –

पीएम स्वानिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज केला जाऊ शकतो. सर्व सरकारी बँकांमध्ये या योजनेचे फॉर्म घेऊन ते भरा. यासोबतच तुम्हाला तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी जोडावी लागेल. अर्ज मंजूर झाल्यानंतर, पहिल्या महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल.

किती कर्ज –

रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी कॅश-बॅकसह डिजिटल पेमेंट (Digital payments) ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या योजनेचे बजेट वाढवले ​​आहे. शहरी भागातील सुमारे 1.2 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे.

या योजनेअंतर्गत 25 एप्रिल 2022 पर्यंत 31.9 लाख कर्ज मंजूर करण्यात आले. याशिवाय 29.6 लाख कर्जापोटी 2,931 कोटी रुपये जारी करण्यात आले. अनुदानाचे व्याज म्हणून 51 कोटी रुपये दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe