NoiseFit Crew : सध्या स्मार्टवॉचची क्रेझ तयार झाली आहे. अनेकजण स्मार्टवॉच वापरू लागले आहेत. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता आता अनेक दिग्ग्ज कंपन्या आपले नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टवॉच लाँच करत आहेत.
अशातच आता ग्राहकांना परवडेल असे स्मार्टवॉच नॉईजने लाँच केले आहे. कंपनीच्या स्मार्टवॉचचे नाव नॉइसफिट क्रू आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीशी एकाच वेळी कनेक्ट करता येणार आहे. जाणून घेऊयात याचे फीचर्स..
काय आहे या स्मार्टवॉचची किंमत
नॉईजचे नवीन स्मार्टवॉच हे पाच रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे, ज्यात ब्लॅक, ब्लू, ग्रे, ग्रीन आणि पिंक कलर पर्याय उपलब्ध आहे. जर किमतीचा विचार केला तर या स्मार्टवॉचची किंमत 1,499 रुपये आहे. जर तुम्हाला स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर फ्लिपकार्टवरून ते खरेदी करता येईल. कंपनी येत्या काही दिवसांत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे या स्मार्टवॉचची विक्री करणार आहे.
असे आहेत स्पेसिफिकेशन
नॉइसच्या नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टवॉचसह ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करते. या स्मार्टवॉचमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.3 उपलब्ध आहे. यात कंपनीने 1.38-इंचाचा डिस्प्ले दिला आहे, जो 240×240-पिक्सेल रिझोल्यूशन आणि राउंड डायलमध्ये येत असून 500 nits ब्राइटनेस उपलब्ध आहे. हे धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंगसह येतो आणि स्मार्टवॉच नॉइसफिट अॅप वापरून iOS आणि Android स्मार्टफोनशी कनेक्ट केले जाऊ शकते.