Ajab Gajab News : डोळ्यांनी नाही तर त्वचेने पाहू शकतो हा अजब मासा ! हल्ला झाला कि घाणेरडा पदार्थ…

Published on -

पृथ्वीच्या पाठीवर असे अनेक जीव आहेत की जे आश्चर्यजनक आहेत. असाच एक मासा आहे जो डोळ्यांनी नव्हे तर त्वचेने पाहतो. हा मासा शत्रूशी न लढताच त्याच्या अंगी असलेल्या अनोख्या गुणांमुळे शत्रूवर मात करतो.

त्याच्यामध्ये रंग बदलण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शिकारींना समजत नाही आणि अनेकदा हा मासा त्यांच्यापासून निसटतो. एवढेच नाही तर कवटी असलेला पण पाठीचा कणा नसलेला (अपृष्ठवंशीय) असा हा जगातील एकमेव प्राणी आहे. हा मासा सुमारे ३०० दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहे.

या माशाचे नाव आहे ‘हॉगफिश’ नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दीर्घ संशोधनानंतर असे आढळून आले की, हॉगफिशची त्वचा इतर माशापेक्षा खूप वेगळी असते. प्रकाशाच्या संपर्कात येऊन त्याचा रंग बदलू शकतो.

एवढेच नाही तर या त्वचेच्या मदतीने तो आजूबाजूच्या गोष्टी पाहू शकतो. म्हणजे हा मासा स्वतःच त्वचेचा डोळा म्हणून वापर करू शकतो. इतकंच नाही तर हल्ला झाल्यास तो एक घाणेरडा पदार्थ आपल्या शत्रूवर सोडतो, जो समुद्राच्या पाण्यात मिसळतो आणि सगळीकडे पसरतो.

या दुर्गंधीयुक्त पदार्थामुळे शत्रू त्याचा नाद सोडून स्वतःच दूर निघून जातो. यूनिवर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना बायोलॉजिस्ट लॉरियन श्वाईकर्ट यांनी सांगितले की, त्याची त्वचा इतकी संवेदनशील आहे की,

हे मासे केवळ बाह्य गोष्टीच नव्हे तर स्वतःचे शरीरदेखील पाहू शकतात. त्यांच्या त्वचेत क्रोमॅटोफोर्स नावाच्या अनेक पेशी असतात, ज्यात अनेक रंगांचे कण असतात. त्यांच्या जवळ येताच, क्रोमॅटोफोर सेल्युलर सिस्टमला कळवतो आणि लगेच रंग बदलतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe