यंदा दत्त जयंती 18 डिसेंबरला; जाणून घ्या पौर्णिमेची तिथी, वेळ काय?

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  भगवान श्री दत्तात्रेयजींची जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी श्री दत्तात्रेय जयंती 18 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी आहे.(Datta Jayanti)

महाराष्ट्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दत्त जयंती हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. संपूर्ण देशात दत्त जयंतीचे महत्त्व असले तरी दक्षिण भारतात त्याचे महत्त्व अधिक आहे.

कारण तेथे अनेक लोक दत्त संप्रदायाशी संबंधित आहेत. असे मानले जाते की भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख, समृद्धी, वैभव मिळते.

जाणून घ्या तिथी वेळ, तारीख :- दत्त जयंती 2021 यंदा 18 डिसेंबर, शनिवारी साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेची सुरूवात 18 डिसेंबरला सकाळी 7.25 ला सुरू होणार असून 19 डिसेंबरला सकाळी 10.06 ला संपणार आहे. या वेळेत दत्त जयंती साजरी केली जाऊ शकते.

जाणून घ्या पूजा विधी

दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून व्रताचा संकल्प घ्यावा.

या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगेत स्नान केल्यानंतर दत्तांच्या पादुकाचे पूजन करणे शुभ मानले असते.

यानंतर श्री दत्तात्रेय यांची धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करून पूजा करावी.

श्री दत्तात्रेय यांचा मंत्रोच्चार आणि स्तोत्रांचे पठण करावे.

श्री दत्तात्रेय यांची गुरु म्हणून पूजा करणे खूप शुभ मानले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!