अहमदनगर ब्रेकिंग : तीन भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Accident

मागील काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरु आहे. अहदनगर जिल्ह्यातही विविध ठिकाणी जीवघेणे अपघात झाले आहेत. मागील दोन दिवसांत वेगवेगळ्या तीन अपघातांमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निंबोडी, चास, अरणगाव शिवारात सोमवारी व मंगळवारी हे अपघात घडले आहेत.

पहिल्या घटनेत सोमवारी नगर-जामखेड रस्त्यावरील निंबोडी शिवारातील जय मल्हार हॉटेलसमोर भीषण अपघात झाला. यामध्ये नगर तालुक्यातील निंबोडी शिवारातील कुनवर सिंग जागीराम (वय ४०) यांचा मृत्यू झाला. या घटनने गावात शोककळा पसरली होती.

दुसरी घटना नगर-दौड महामार्गावर मेहराबाद भुयारी पुलाजवळ सोमवारी रात्री घडली. स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिली. यात दोन युवकांचा मृत्यू झाला. साहिल कैलास नेटके (क्य १८) व अनिकेत बंडू साठे (क्य १७, दोघे रा. वाळकी, ता. नगर) अशी मृतांची नावे आहेत. दोन युवकांच्या अशा जाण्याने गावावर शोककळा पसरली होती.

नगर-पुर्ण महामार्गावरील चास शिवारात मंगळवारी सायंकाळी तिसरी अपघाताची घटना घडली. येथे झालेल्या अपघातात वृध्दाचा मृत्यू झाला. सूर्यभान नामदेव भोर असे मयत वृध्दाचे नाव असल्याचे समजते. या अपघात प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe