अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी केला.
दरम्यान आता ते आणखी नवे घोटाळेबाहेर काढणार असून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि ४० चौरांचा हिशेब लोकांपुढे ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम काम ठाकरे सरकारने केले.
शेवटी आम्ही राज्यपालांकडे गेल्यानंतर ठाकरे यांनी पाठ फिरवली आणि सर्व पेपर फाडले. आम्ही त्या ठिकाणी रुग्णालय बांधणार नाही, असे नंतर त्यांनी सांगितले.
खरे तर हे रुग्णालय बांधण्याचे काम नव्हते, तर कोविडच्या नावाखाली जमीन बळकावण्याचे काम होते.असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान ११ नोव्हेंबर २०२० रोजी पहिला घोटाळा आपण बाहेर काढला.
आता आणखी काही नवे घोटाळे बाहेर काढणार आहे. अलीबाबा अणि ४० चोरांचा हिशेब येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ठेवणार आहे. प्रताप सरनाईक भरपूर बोलत होते.
पण, ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर ते आता कुठे गेले? असे अनेक सावक किरीट सोमय्या यांनी केले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम