Tingling Sensation In Leg : धावपळीच्या जगात अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. परिणामी अनेक आजारांमुळे त्यांचे प्राण धोक्यात येतात.
यापैकी एक म्हणजे अनेकांच्या पायांना मुंग्या येतात. जरी पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या असली तरी त्यामुळे तुम्ही खूप मोठ्या अडचणीत येऊ शकता. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फटका सहन करावा लागू शकतो.
या कारणामुळे पायांना येतात मुंग्या
1. मूत्रपिंड निकामी होणे –
पायांना मुंग्या येण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे मूत्रपिंडाचा आजार होय. जर किडनी निकामी झाली तर किडनीची कार्यक्षमता कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे रक्तात टाकाऊ पदार्थ वाढून स्नायू आणि नसा खराब होत जातात. अशा स्थितीत पायासोबतच हातानांही मुंग्या येतात.
2. मधुमेह –
शरीरातील साखरेची पातळीत वाढ झाली तर पायांना मुंग्या येतात. त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असेही म्हटले जाते. या समस्येमुळे हात आणि पायांवर परिणाम दिसून येतो.
3. व्हिटॅमिन बी 12-
नसा मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप गरजेचे आहे. परंतु अनेकजण व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेने त्रस्त आहेत. त्यामुळे मज्जातंतूंमध्ये मुंग्या येतात.
4. अल्कोहोल-
अल्कोहोलचे अनेक दुष्परिणाम असून त्यामुळे यकृत आणि किडनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जे लोक दररोज मद्यपान करतात त्यांच्या मज्जातंतूंच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.