अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- आर्थिक भार विरहित मागण्यावर लवकरच निर्णय घेऊ व आर्थिक बोजा पडणाऱ्या मागण्या कोरोना लाट आटोक्यात आल्यानंतर निर्णय घेऊन ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या मागणीनुसार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास मंत्रालय व कक्ष अधिकारी ग्रामविकास विभाग यांचे उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य अध्यक्ष विजय म्हसकर सरचिटणीस के. आर. किरुळकर, राज्य उपाध्यक्ष सागर सरावणे, राज्य सचिव अनिल जगताप, छत्रपती ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन सुदाम बनसोडे, व्हाइस चेअरमन ज्ञानेश्वर मेहेत्रे, श्रीगोंदे अध्यक्ष नवनाथ गोरे,
भाऊसाहेब भांड, संतोष देशमुख, कारभारी जाधव, दत्ता जंगाले आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने ग्रामसेवक संवर्गाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी वेतन त्रुटींची मागणी मार्गी लावणे करिता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करून
ग्रामसेवक निवडीची शैक्षणिक पात्रता पदवी करून ग्रामसेवक एकच पद निर्माण करावे व दुसरी पदोन्नती थेट विस्तार अधिकारी म्हणून द्यावी, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करून ५०५ विस्तार अधिकारी पदे निर्माण करावीत आदी मागण्या केल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम