अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८३५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २३ हजार १७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३७ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ४७९ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४१२ आणि अँटीजेन चाचणीत २४० रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०९, कर्जत ०१, नगर ग्रामीण ११, नेवासा ०३, पारनेर २१, पाथर्डी ०७, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ३८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले २५, जामखेड ०२, कर्जत १९, कोपरगाव २०, नगर ग्रा.३०, नेवासा ३०, पारनेर १५, पाथर्डी १०, राहाता ५५, राहुरी २७, संगमनेर ८०, शेवगाव ५२, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १९ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २४० जण बाधित आढळुन आले. अकोले २४, जामखेड १२, कर्जत २७, कोपरगाव १५, नगर ग्रा. ०९, नेवासा १७, पारनेर ३७, पाथर्डी १७, राहाता १०, राहुरी ३३, संगमनेर १५, शेवगाव ०४, श्रीगोंदा १४, श्रीरामपुर ०४ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ७१, जामखेड २२, कर्जत ४८, कोपरगाव १८, नगर ग्रा. २६, नेवासा ५८, पारनेर ९९, पाथर्डी ४३, राहाता २२, राहुरी २७, संगमनेर २१५, शेवगाव ६१, श्रीगोंदा ७४, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०७ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,२३,१७३
उपचार सुरू असलेले रूग्ण:५४७९
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६६९५
एकूण रूग्ण संख्या:३,३५,३४७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम