Top 5 Cars : प्रत्येकाची स्वप्नातली गाडी (Dream Car) ठरलेली असते. सध्या सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरु आहे. अनेकजण या हंगामात कार (Car) खरेदी करतात.
परंतु, काहीवेळा आपण खरेदी केलेली कार ही चांगले मायलेज (Mileage) देतेच असे नाही. परंतु, बाजारात अशा काही कार आहेत ज्या कमी किमतीत चांगले मायलेज देतात.

मारुतीच्या (Maruti) या मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 13.96 लाख रुपये आहे. या 5-सीट SUV चे 11 प्रकार आहेत, ज्यामध्ये Brezza Lxi हे बेस मॉडेल आहे आणि Brezza Zxi Plus AT DT हे टॉप मॉडेल आहे. या वाहनात 1462 cc चे इंजिन उपलब्ध आहे. हे वाहन 20.15 किमी पर्यंत मायलेज देते.

टाटाच्या (Tata) या दमदार एसयूव्हीची (SUV) सुरुवातीची किंमत 5.93 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर गाडीमध्ये 1199 cc चे पॉवरफुल इंजिन उपलब्ध आहे.
कंपनीने या मॉडेलचे 22 प्रकार दिले आहेत. यात पंच प्युअर हे बेस मॉडेल आहे आणि काझीरंगा एडिशन हे टॉप मॉडेल आहे. या वाहनाचे मायलेज 18.97 किमी आहे.
या 5-सीट एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 5.84 लाख ते 10.62 लाख रुपये आहे. पॉवरबद्दल बोलायचे झाले तर यात 999 cc चे पेट्रोल इंजिन आहे. मायलेज 18.24 किमी ते 20.5 किमी आहे. Renault Kiger बेस मॉडेल RXE आणि टॉप मॉडेल RXZ Turbo CVT DT सह एकूण 20 प्रकारांमध्ये येते.
टाटाचे हे वाहन पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये येते. इंजिन पॉवरबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोल इंजिन 1199 cc आणि डिझेल इंजिन 1497 cc आहे. Nexon च्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.59 लाख रुपये आहे. Nexon 67 प्रकार आणि 8 रंगांमध्ये येतो.
Renault MUV ची सुरुवातीची किंमत 4.95 लाख रुपये आहे. कारमध्ये (Renault MUV) 7 जागा आहेत. इंजिन क्षमता 999 cc आहे. ही कार 20 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. ही कार 10 वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये येते. ट्रायबर RXZ EASY-R AMT ड्युअल टोन हे टॉप मॉडेल आहे, ज्याची किंमत रु.8.51 लाख आहे.