Toyota SUV : सणासुदीचा हंगाम (festive season) सुरू झाल्यामुळे, काही वाहन निर्माते त्यांच्या कार्सच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत, तर काही कंपन्यांनी त्यांच्या कार्सच्या पोर्टफोलिओच्या किमती अपडेट केल्या आहेत.
टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने देशांतर्गत बाजारात आपल्या मॉडेल्सच्या किमतीत आणखी एक वाढ जाहीर केली आहे. कंपनीने आपली सर्वाधिक विक्री होणारी फुल-साइजची SUV फॉर्च्युनर (Fortuner) आणि इनोव्हा क्रिस्टा प्रीमियम MPV (Innova Crysta Premium MPV), Camry Hybrid आणि Vellfire सारख्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत.
टोयोटाने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला फॉर्च्युनरचे फेसलिफ्ट केलेले मॉडेल बाजारात आणले होते. नवीन किंमत अपडेट पाहता, फॉर्च्युनरच्या सध्याच्या मॉडेलमध्ये 77,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, आता त्याच्या टू-व्हील ड्राइव्ह मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंटची किंमत 32.59 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप लेजेंड टू-व्हील ऑटोमॅटिक किंमत व्हेरियंटची किंमत 42.82 लाख रुपये झाली आहे.
विशेष म्हणजे, जेव्हा कंपनीने फॉर्च्युनरचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले, तेव्हा या व्हेरियंटची किंमत 37.58 लाख रुपये होती. तेव्हापासूनच्या किमतींची तुलना केल्यास, त्यांच्यात सुमारे 5.24 लाख रुपयांचा फरक आहे. लॉन्चच्या वेळी, बेस मॉडेलची किंमत 29.98 रुपये होती, जी आता 32.59 लाख रुपये असेल.
टोयोटाने गेल्या वर्षी जानेवारीत आपले फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले होते. कंपनीने फॉर्च्युनर डिझेल टू-व्हील ड्राईव्ह व्हेरियंटची किंमत 19,000 रुपयांपर्यंत आणि फोर व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची किंमत 39,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. याशिवाय Legend आणि GR स्पोर्ट व्हेरियंटच्या किमतीत 77,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी, मागील किंमतीच्या तुलनेत पेट्रोल व्हेरियंटमध्ये 19,000 रुपयांपर्यंत वाढ दिसून आली आहे.
Innova Crysta
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एमपीव्ही आहे आणि मॉडेलच्या सर्व डिझेल व्हेरियंटच्या किमतीत 23,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अशाप्रकारे, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा MPV च्या डिझेल व्हेरियंटची किंमत आता G MT 7-सीटर व्हेरियंटसाठी 19.13 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) पासून सुरू होते, तर टॉप-स्पेक ‘ZX’ ट्रिम व्हेरियंटची किंमत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आता रु. 26.77 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
दुसरीकडे, मॅन्युअल ट्रान्समिशनसह सुसज्ज असलेल्या पेट्रोल-चालित इनोव्हा क्रिस्टा एमपीव्हीच्या फक्त ‘GX’ ट्रिम प्रकारात 23,000 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, टोयोटाने अद्याप डिझेलवर चालणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा एमपीव्हीसाठी बुकिंग सुरू केलेले नाही, तर ऑटोमेकरने इनोव्हा क्रिस्टल एमपीव्हीच्या सर्व डिझेल व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी कंपनीने इनोव्हाच्या डिझेल व्हेरियंटचे बुकिंग बंद केले होते. या व्यतिरिक्त, Toyota Vellfire luxury MPV च्या किमतींमध्ये 1.85 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे . या वेळी कोणत्याही टोयोटा मॉडेलची सर्वाधिक किंमत वाढली आहे.
याशिवाय टोयोटा कॅमरी हायब्रिडच्या किमतीतही 90,000 रुपयांनी वाढ करण्यात आली असून आता या हायब्रीड सेडानची किंमत आता 45.25 लाख रुपये (एक्स-शोरूम) झाली आहे. कंपनी टोयोटा फॉर्च्युनरच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवर देखील काम करत आहे आणि नजीकच्या भविष्यात डिझेल हायब्रिड पॉवरट्रेनसह ते ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.