अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Ahmednagar News :- नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटाजवळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सकाळीच पुण्याकडे निघालेल्या नागरिकांना तासाभरापासून या कोंडीत अडकून पडावे लागले आहे.
पारनेर तालुक्यात आज सकाळी काही भागात हलका पाऊस झाला. सुपे परिसरातही पाऊस झाला आहे. अशाच पुढे वाहतुकीची कोंडी झाली आहे. सुप्यापासूनच वाहतूक संथ गतीने झाली असून पुढे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.
नगरहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुढे अपघात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी नेमके कोठे आणि काय झाले याचा तपाशील मिळू शकला नाही.
वाहने थांबल्याने वाहनचालक आणि नागरिक खाली उतरून पुढे काय घडले, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.