राज्यातील ५४ तर जिल्ह्यातील ३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून बदल्या रखडलेल्या होत्या. आज अखेर त्याला मुहूर्त मिळाला.

राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्त /अपर अधीक्षक यांच्या सह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त उपाध्यक्ष यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ६ सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे.

तर औरंगाबाद नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली आहे. या बदली प्रक्रियेत नगर जिल्ह्यातील दीपाली काळे ( अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर) यांची नाशिकला पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षक म्हणून बदली त्यांच्या जागी अंबाजोगाई येथून स्वाती भोर यांची बदली झाली आहे.

तर विशाल ढुमे ( डीवायएसपी, नगर शहर) यांची औरंगाबाद शहरात बदली झाली असून प्रांजली सोनवणे (डीवायएसपी आर्थिक गुन्हे) यांची सोलापूर शहरात बदली झाली आहे. नगरला डीवायएसपी मुख्यालय या पदावर पिंपरी चिंचवड येथून संजय नाईक पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe