परिवहन मंत्री म्हणाले…एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी साईबाबांना साकडे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :-  राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला एक महिना उलटून गेला तरीसुद्धा संपावर अद्याप तोडगा निघाला नाही आहे. राज्य सरकारने ऐतिहासिक पगारवाढ देऊन देखील एसटी कर्मचार्‍यांचा संप सूरूच आहे.

दरम्यान राज्यातील एसटी कर्मचारी संपाचा तिढा सुटावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी श्री साईबाबांकडे प्रार्थना केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्याचे परिवहन तथा संसदीय कार्यमंत्री ना.अनिल परब यांनी आज शिर्डीत आरतीला येऊन साईदरबारी हजेरी लावली. श्री साईबाबांची आरतीला उपस्थित राहून साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते ना.अनिल परब यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना परब म्हणाले,

एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी साईबाबांना साकडे घातले आहे. मी साईबाबांच्या दर्शनासाठी नेहमीच येत असतो. एसटी कामगारांनी तातडीने कामावर रुजू व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe