अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-23 मार्च 2020 हा शेअर बाजारासाठी एक वाईट दिवस होता. त्यादिवशी कोरोना संकटामुळे शेअर बाजार कित्येक वर्षांच्या नीचांकावर पोहोचला.
परंतु त्यानंतर शेअर बाजाराने केवळ गमावलेली धार मिळविली नाही तर बर्याच नवीन विक्रमी स्तरांना स्पर्श केला. गेल्या एका वर्षात शेअर बाजाराने बराच वेग पकडला आहे. या कालावधीत, बरेच शेअर असे होते,
ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे 10 पट वाढले. येथे आम्ही तुम्हाला अशा काही निवडक शेअरविषयी माहिती देऊ, ज्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
दीपक नाइट्राइट :- दीपक नायट्राईटने एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवले आहेत. 23 मार्च 2020 रोजी हा शेअर 324 रुपयांवर आला होता.
पण 22 मार्च रोजी ते 1531 रुपयांवर पोचले. म्हणजेच, एका वर्षात गुंतवणूकदारांकडे 4 पट जास्त पैसे आले. मार्चमध्ये दीपक नायट्राइटच्या शेअरने 1600 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
अदानी ग्रीन :- गेल्या एका वर्षात अदानी समूहाच्या जवळपास सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये अदानी ग्रीन देखील आहे. ही अदानी समूहाची ती कंपनी आहे जिने गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा दिला आहे.
23 मार्च 2020 रोजी अदानी ग्रीनचा शेअर 135 रुपये होता. 22 मार्च 2021 रोजी त्याचा दर 1252 रुपये नोंदविला गेला. म्हणजेच या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 10 पट वाढविले.
आरती ड्रग्स :- कोरोनामुळे सर्व क्षेत्रांची अवस्था खालावत असताना फार्मा क्षेत्राने चांगली कामगिरी केली. यामुळे फार्मा शेअर्सनी गुंतवणूकदारांना खूप फायदा दिला.
आरती ड्रग्स देखील जोरदार परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये आहे. वर्षभरापूर्वी हा शेअर 115 रुपये होता तर काल तो 733 रुपयांवर पोहोचला. या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 7 पट वाढविले.
आलोक इंडस्ट्रीज :- आलोक इंडस्ट्रीजनेही गुंतवणूकदारांची चांदी केली. या कंपनीचा स्टॉक 1 वर्षात 5.20 रुपयांवरून 20.95 रुपयांवर गेला.
म्हणजेच या कंपनीत जर एखाद्या गुंतवणूकदाराचे 1 लाख रुपयांचे शेअर्स असतील तर त्याची रक्कम 4 लाखाहून अधिक झाली असेल.
डिक्सन टेक्नोलॉजीज :- डिक्सन टेक्नोलॉजीजने गुंतवणूकदारांचे पैसे 6 पटीपेक्षा जास्त वाढविले आहेत. या कंपनीचा स्टॉक 1 वर्षात 643 रुपयांवरून 4054 रुपयांवर गेला आहे. जर आपण प्रति शेअर्सची कमाई पाहिली तर गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरमध्ये 3411 रुपये नफा झाला आहे.
अदानी पोर्ट्स :- गेल्या 1 वर्षात अदानी पोर्ट्सचे शेअर्स 207 रुपयांवरून 722 रुपयांवर गेले आहेत. म्हणजेच अदानी पोर्ट्सने गुंतवणूकदारांचे 1 लाख 3 लाख रुपयांहून अधिक केले आहे. अदानी पोर्ट्स अदानी समूहाची एक प्रमुख कंपनी आहे.
टाटा मोटर्सने केले मालामाल :- टाटा मोटर्स ही एक लार्ज कॅप कंपनी आहे. या कार कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एक वर्षापूर्वी हा शेअर फक्त 66 रुपये होता, तो 22 मार्चपर्यंत 302 रुपयांवर पोचला. एका वर्षात, स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ 5 पट वाढवले.
एसबीआय :- एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या स्टॉकमध्ये 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. 1 वर्षात बँकेचा शेअर 181 रुपयांवरून 367 रुपयांवर गेला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|