Truecaller ने खास महिलांच्या सुरक्षिततेसाठी लाँच केले ‘हे’ अ‍ॅप; ‘असा’ होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-स्वीडनची कंपनी Truecaller हे जगभरातील एक लोकप्रिय अॅप आहे. आता Truecallerने एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. या अॅपला Guardiansअसे नाव देण्यात आले आहे.

Guardiansअॅप जागतिक स्तरावर सुरू होत आहे. ट्रूकॅलरच्या म्हणण्यानुसार हे अॅप स्टॉकहोम आणि भारत यांच्या टीमने 15 महिन्यांत तयार केले आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की हे अॅप महिलांच्या सुरक्षेसाठी खास तयार केले गेले आहे. “वैयक्तिक सुरक्षा आणि लोकेशन शेअरिंगसाठी शेकडो अ‍ॅप्स मार्केटमध्ये आहेत. पण सर्वांपेक्षा Guardians अ‍ॅप वेगळं आहे”,

असं Truecaller चे सहसंस्थापक आणि सीईओ Alan Mamedi यांनी सांगितलं. या अ‍ॅपद्वारे तुम्ही Always Share लोकेशन सिलेक्ट करुन आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत (Guardians) नेहमी लोकेशन शेअर करु शकतात.

एखाद्या ठिकाणी जाताना लोकेशन शेअर करण्याचा पर्यायही यामध्ये आहे. तसेच, आपात्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरिंगचा पर्यायही मिळेल.

लोकेशन शेअरिंगसोबतच तुमच्या मोबाइल बॅटरी आणि नेटवर्क स्टेटसची माहितीही समोरच्या व्यक्तीला मिळते. फोन किती वेळ सुरू राहू शकतो हे समजण्यासाठी ही माहिती कामी येते.

याशिवाय कंपनी येत्या काळात आपात्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरिंगऐवजी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्याच्या पर्यायावररही काम करणार आहे.

जर तुम्ही ट्रू-कॉलर युजर असाल तर त्याच आयडीद्वारे Guardians अ‍ॅपमध्ये लॉग-इन करु शकतात. ट्रू-कॉलर युजर नसाल तर फोन नंबरद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करुन लॉग-इन करु शकतात.

मिस कॉल देऊन ओटीपी मिळवू शकतात. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमचं लोकेशन, कॉन्टॅक्ट्स आणि फोनची परवानगी द्यावी लागेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर