अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस. होय. या शो बद्दल अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. बिग बॉसच्या घरातून जे स्पर्धक बाहेर पडले त्यांची पुन्हा एण्ट्री होणार आहे.
यामध्ये तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्यचा समावेश आहे. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे, हे या तिघांनी सांगितले.
स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रू अनावर झाले.
यावेळी स्नेहाने जयला खडे बोल सुनावले आहेत तर तृप्ती देसाईंनी विशालचे भरभरून कौतुक केले आहे. तर तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘विशाल एकदम मस्त… मागच्या आठवड्यात जो ट्रॅक चेंज केला ना, वन मॅन आर्मी.
जे मी पहिल्यापासून सांगत होते कुठेतरी चेंज झाला पाहिजे आणि तुम्हांला सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही! लंबी रेस का घोडा है! मस्त एकदम. मी सगळ्यांना सांगितलं की, सगळ्यात छान मनं आमच्या विशालचं आहे,
की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं कधी नसतं…” तसेच तृप्ती देसाई मीराला म्हणाल्या तू फटक्यांमध्ये लक्ष्मी बॉम्ब आहेस. तर मीनलला असं म्हणाल्या की तुम्ही या खेळात सुतळी बॉम्ब आहात.
मुलींमध्ये त्या स्ट्राँग प्लेअर असल्याचंही तृप्ती देसाई म्हणाल्या. एकीकडे तृप्ती देसाईंनी या प्लेअर्सचं कौतुक केलं तर स्नेहाने जय दुधाणेवर ताशेरे ओढले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम