TVS Electric Scooter 2023 : भारतीय बाजारात पेट्रोलच्या किमती वाढल्या असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी होत आहे. अनेक दिग्ग्ज कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लाँच करू लागल्या आहेत. अशातच आता बाजारात लवकरच शक्तिशाली मायलेज असणाऱ्या स्कुटरची एंट्री होणार आहे.
TVS मोटर्सच्या आगामी इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये उत्कृष्ट स्टायलिश लुक तसेच उत्कृष्ट फीचर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दरम्यान कंपनीच्या अनेक बाईक्सना भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.जाणून घेऊयात कंपनीच्या आगामी स्कुटरची फीचर्स.
TVS ची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर
टीव्हीएसची आगामी इलेक्ट्रिक स्कूटर सध्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर iCube च्या तुलनेत किफायतशीर असेल. त्यात सामान लोड करण्यासाठी कॅरियर असणार आहेत या द्वारे ग्राहकांना B2B आणि B2C जागेत माल पोहोचवता येईल. तसेच यात सपाट आसन असून याच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जागा असणार आहे.
किती असणार रेंज?
कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये TVS iQube पेक्षा लहान बॅटरी असण्याची दाट शक्यता आहे. या स्कुटरची रेंज एका चार्जवर 100 किलोमीटरपर्यंत असेल. फिचर्स आणि स्पीडच्या बाबतीत विचार केला तर कंपनीची आगामी स्कुटर मिड रेंज इलेक्ट्रिक स्कूटरसारखे असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या TVS इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जास्तीत जास्त माहिती येत्या काळात उपलब्ध होणार आहे. किमतीचा विचार केला तर या स्कूटरच्या किमतींबाबत कंपनीकडून अजूनही कोणतीही माहिती देण्यात आली नाही.