Maharashtra news :नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं ट्वीट केलं आहे.
त्यामुळे बंडखोर गटात सामील होत पक्षविरोधी काम केल्याचा ठेपका ठेवत पाटील यांच्यावर ही कारवाई केली गेल्याचे सांगण्यात आले. आढळराव पाटील हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांनी सातत्याने संघर्ष करून त्या भागात शिवसेना जिवंत ठेवली.